
मराठी भाषा ही मातृभाषा असल्यामुळे या विभागाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महाविद्यालयाच्या स्थापना वर्ष 1971 पासून या महाविद्यालयामधील मराठी विभाग हा मराठी भाषा व साहित्याच्या ज्ञानदानाचे महत्त्वाचे कार्य करण्यामध्ये योगदान करत आहे. मराठी भाषेचा जगामध्ये चौदावा क्रमांक लागतो. भारत सरकारने मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा दिलेला आहे.
जवळपास पंधराशे ते दोन हजार वर्षाआधी पासून या भाषेच्या अस्तित्वाचे पुरावे सापडतात. तिच्यातील शिलालेख, ताम्रपट आणि लिखित साहित्यामुळे तिला पौराणिक भाषेचा दर्जा व महत्त्व प्राप्त झालेला आहे.
कला व वाणिज्य शाखेत संदेश - सूचनाचे माध्यम म्हणून मराठी भाषेचा प्रमुखपणे वापर केला जातो. सामाजिक व सांस्कृतिक वारसा समजण्यासाठी, जतन करण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी मराठी भाषा विषयाचा उपयोग होतो. मराठी भाषा ही मातृभाषा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. एकूणच माणूस घडण्याच्या प्रक्रियेमध्ये मराठी भाषेचे अनमोल असे योगदान आहे.